प्रशांत किशोर यांचा राष्ट्रीय जनता दलावर आरोप; म्हणाले “भ्रष्टाचार आणि गुंडगीरीच्या पलिकडे…”

Prashant Kishor| निवडणूक रणनीतीज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी राष्ट्रीय जनता दलावर टीका केली आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या काल झालेल्या एका प्रचारसभेत या पक्षाचे नेते आणि लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी पक्षाच्याच एका कार्यकर्त्याला व्यासपीठावरून ढकलले होते. या मुद्द्यावरून निवडणूक रणनीतीज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी राजदवर टीका केली आहे. ते म्हणाले की बिहारचे लोक असे मानतात की ही मंडळी जातीवाद, हिंदु- मुस्लिम, भ्रष्टाचार आणि गुंडगीरीच्या पलिकडे जाऊन राजकारण करूच शकत नाहीत.
प्रशांत किशोर म्हणाले, “लालू-नितीश गेल्या 30 वर्षांपासून बिहारवर राज्य करत आहेत आणि त्यांनी विश्वास तोडण्याचे सर्वाधिक काम केले आहे. गेल्या 30 वर्षात ना गरीबी कमी झाली ना बिहारमधून लोकांचे स्थलांतर थांबले. शिक्षण व्यवस्था जर तुमच्यात सुधारणा झाली नाही किंवा तुम्हाला रोजगार मिळाला नाही, तर तुम्ही कोणत्या विश्वासाबद्दल बोलत आहात?” तुम्ही पैशाच्या नावावर, जातीच्या नावावर काही लोकांना जमवणार. यावेळी तेजस्वीने समजून घेतले पाहिजे की लाकडी भांडे पुन्हा पुन्हा उकळत नाहीत. या वेळी जनता त्यांच्या शब्दांना विकत घेणार नाही.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी मीसा भारती यांच्या नामांकनाच्या दिवशी सोमवारी (१३ मे) आरजेडीने निवडणूक बैठकीचे आयोजन केले होते. दरम्यान, व्यासपीठावर उपस्थित मीसा भारती यांचे भाऊ आणि आमदार तेज प्रताप यांना काही गोष्टीचा राग आला आणि त्यांनी एका कार्यकर्त्याला धक्काबुक्की केली. त्यावेळी येथील वतावरणही तापले होते. मात्र पक्षाचे नेते शक्ती यादव आणि इतरांनी हे प्रकरण शांत केले.
हेही वाचा :
“राज्यात महायुती ‘एवढ्या’ जागा जिंकणार” ; रोहित पवारांनी सांगितला आकड्यांचा खेळ





