मेरठ – कॉंग्रेस पक्षाच्या सदस्य आणि अभिनेत्री अर्चना गौतमच्या वडिलांच्या तक्रारीवरून कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांच्या स्वीय सहायकाविरुद्ध धमकी दिल्याच्या आरोपावरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
संदीप सिंह असे या गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते प्रियंका गांधींचे स्वीय सहायक आहेत. त्यांनी अभिनेत्री अर्चना हिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, अशी तक्रार तिच्या वडिलांनी दाखल केली आहे असे पोलिसांनी सांगितले.
अर्चना यांचे वडील गौतम बुद्ध यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, संदीप सिंह यांनी गेल्या महिन्यात प्रियंका गांधी यांना भेटायचे आहे, असे कारण सांगून आपल्या मुलीला छत्तीसगडमधील रायपूर येथे बोलावले होते. संदीपसिंह यांनी तिच्याशी गैरवर्तन केले आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यांनी आपल्या मुलीला जाती वरूनही अवमानकारक भाषा वापरली, असाही त्यांचा आरोप आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/womens-day-2023-government-will-continue-to-work-for-womens-empowerment-pm-modi/
बिग बॉस-फेम अर्चना गौतम यांनी 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत हस्तिनापूर राखीव जागेवरून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि त्या प्रदेशातील कॉंग्रेस पक्षाचा दलित चेहरा मानल्या जात होत्या.