अहमदाबाद – गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात बुधवारी पहाटे 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा हादरा जाणवला, असे इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मोलॉजिकल रिसर्चने म्हटले आहे.
कच्छ जिल्ह्यातील भचाऊ शहरापासून सुमारे 10 किमी उत्तर-ईशान्य येथे 24.6 किमी खोलीवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. हा धक्का पहाटे 3:42 वाजता नोंदवला गेला.यात मालमत्तेचे किंवा जीविताचे कोणतेही नुकसान झाले नाही. काही भागात 27 फेब्रुवारीला 3.8 रिश्टर स्केलचा धक्का बसला होता.
Karnataka Bandh : मोठी बातमी! काँग्रेसकडून ‘या’ कारणामुळे उद्याचा कर्नाटक बंद मागे
कच्छ जिल्हा “अत्यंत उच्च जोखीम” भूकंपप्रवण क्षेत्रात स्थित आहे आणि सौम्य हादरे बसणे ही एक नियमित घटना आहे. 2001 चा कच्छ भूकंप गेल्या दोन शतकांमध्ये भारतातील तिसरा सर्वात मोठा आणि दुसरा सर्वात विनाशकारी भूकंप होता, ज्यामध्ये 13,800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि 1.67 लाख लोक जखमी झाले होते.