Archana Gautam| अभिनेता अजय देवगणचा ‘मैदान’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. यात अजय फुटबॉल कोचच्या महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. मागील अनेक दिवसांपासून हा चित्रपट कोणत्या न कोणत्या कारणामुळे रखडत होता.
अखेर हा चित्रपट 10 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या स्क्रीनिंग वेळी बिग बॉस फेम अर्चना गौतम देखील हजेरी लावली होती. मात्र स्क्रीनिंगआधी एका महिला सुरक्षा रक्षकाने अर्चनाला थेट बाहेर काढले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अजय देवगणच्या ‘मैदान’ सिनेमाचं स्क्रीनिंग काल उत्साहात पार पडलं. ‘बिग बॉस 16’ फेम अर्चना गौतमही इव्हेंटसाठी पोहोचली. यावेळी तिने खास लुक केल्याचे पाहायला मिळाले. व्हायरल व्हिडिओमध्ये, अर्चना कॅमेऱ्यासमोर पोज देत असल्याचे पाहायला मिळते. त्याचवेळी एक महिला सुरक्षारक्षक येते आणि अर्चनाला हाताला धरुन बाहेर नेते. तेव्हा सुरक्षारक्षक असे का करत आहे हे कोणालाच काही समजत नाही.
View this post on Instagram
सत्य आले समोर
त्याचं झालं असं की, मैदान स्क्रीनिंगवेळी सर्व आमंत्रितांना एक विशिष्ट प्रकारचा बँड देण्यात आला होता. हा बँड दाखवूनच सेलिब्रिटींना थिएटरमध्ये प्रवेश होता. पण अर्चनाने हा बँड घेतला नसल्याने महिला सुरक्षारक्षकाने तिला बाहेर नेले आणि तिला बँड देऊनच एन्ट्री दिली.
दरम्यान, मैदान हा चित्रपट 1950 ते 1963 च्या कालावधीत फुटबॉलच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक आणि मॅनेजर असलेल्या सैय्यद अब्दुल रहिमच्या जीवनावर हा सिनेमा आधारलेला आहे. या सिनेमात अजय देवगण अब्दुल सैय्यद रहिमच्या रोलमध्ये दिसत आहे.
हेही वाचा:
काय सांगता …! भाजप उमेदवाराने निवडणूक प्रचारादरम्यान महिलेचे घेतले ‘चुंबन’