पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरने अभिनेत्री ऐश्वर्या रायबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. वर्ल्ड कप 2023 मधील पाकिस्तान क्रिकेट टीमच्या निराशाजनक परफॉर्मन्सवर टिप्पणी करताना अब्दुल रझाकने पाकिस्तान क्रिकेट बोर्डवर (पीसीबी) टीका केली आणि त्या ओघात त्याने अभिनेत्री ऐश्वर्या रायबाबत आक्षेपार्ह विधान केले. यावर आता प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील संताप व्यक्त करत अब्दुल रझाकवर जोरदार हल्ला चढवला आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्वीट करत लिहिले की, “स्वत:ला पाकिस्तानचे माजी क्रिकेटर म्हणणारे काही ‘छछूंदरां’नी ऐश्वर्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. त्याच्या बाजूला बसलेले जे टाळ्या वाजवत होते त्यांनी फक्त त्यांच्या दयनीय संगोपनाचा पर्दाफाश केला आहे. मात्र तिच्याबाबत असभ्य टिप्पण्या केल्यानंतरही ऐश्वर्याचा दर्जा नेहमीच उंच राहील.”
Some छछून्दरs who identify themselves as former cricketers of Pakistan made vile comments about Aishwarya Rai. All these छछून्दरs who were laughing&clapping to the comment have only exposed their pathetic upbringing. Aishwarya continues to stand tall despite& inspite their…
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) November 14, 2023
अब्दुल रझाक काय म्हणाला ?
“जर तुम्ही विचार करत असाल की ऐश्वर्याशी (राय) लग्न केल्याने चांगली आणि प्रामाणिक मुलं जन्माला येतील, तर असं कधीच होणार नाही. म्हणूनच तुम्हाला आधी तुमचा उद्देश नीट ठरवावा लागेल”, असं तो म्हणाला. पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या माध्यमांकडून त्याला जेव्हा वर्ल्ड कपमधील टीमच्या परफॉर्मन्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने हे वक्तव्य केलं.
यावेळी पत्रकार परिषदेत पाकिस्तानी खेळाडू अब्दुल रझाकच्या बाजूलाच बसलेल्या शाहिद आफ्रिदी आणि उमर गुल यांनी टाळ्या वाजवल्या. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विधानानंतर मागितली माफी
पत्रकार परिषदेत क्रिकेटबद्दल बोललं जात होतं आणि माझी जीभ घसरली, अशी कबुली अब्दुल रझाकने दिली. “क्रिकेटबद्दल बोलताना माझ्या तोंडून चुकून ऐश्वर्याजींचं नाव निघाले. मी त्यांची माफी मागतो. मला दुसरंच उदाहरण द्यायचं होतं, पण तोंडून त्यांचं नाव निघालं”, असे म्हणत त्याने माफी मागितली.