पटना – बिहार विधानसभा निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. अशातच उद्या (बुधवारी) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस नेते राहुल गांधी आपापल्या आघाडी पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचारासाठी बिहारमध्ये दाखल होणार आहेत.
दोन्ही नेत्यांचा हा दुसरा प्रचार दौरा ठरणार असून यापूर्वीही मोदी व गांधी निवडणूक प्रचारसभांसाठी गेल्या २३ ऑक्टोबरला एकाच दिवशी बिहारमध्ये दाखल झाले होते.
एनडीए उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्या (बुधवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन सभा घेणार आहेत. दरभंगा, मुझफ्फरनगर आणि पटना येथे मोदींच्या सभा होतील. या मतदारसंघांमध्ये निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात ३ नोव्हेंबरला मतदान होईल.
राहुल गांधी हे देखील उद्या बिहारचा दूर करणार असून ते दोन निवडणूक सभांना उपस्थिती दर्शवणारी आहेत. बिहारमध्ये काँग्रेस राजदसोबतच्या महाआघाडीसोबत निवडणूक लढवत आहे. गांधी यांच्या सभा दरभंगा जिल्ह्यातील वाल्मीकी नगर व कुशेश्वर अस्थन येथे होतील.
बिहार विधानसभांच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसोबतच वाल्मिकी नगर लोकसभेची पोट निवडणूक देखील होणार आहे. यासाठी ३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.