‘सीआयडी’ मालिकेतील अभिनेत्रीला गांजा खरेदी करताना रंगेहात अटक

मुंबई – अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर ‘बाॅलिवूड ड्रग्ज प्रकरण’ आलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. या प्रकरणात सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पादुकोण, दिया मिर्झा यांसारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांची नावं समोर आली आहे. त्यात आता टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहान हिला गांजा खरेदी करताना रंगेहात पकडल्याने तिचेही नाव या यादीत समाविष्ट झाले आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई पोलीसांनी सापळा रचून प्रीतिकाला गांजा खरेदी करताना रंगेहात पकडलं आहे. तिच्याकडून 99 ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे. तिच्यासोबत आणखी पाच जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या प्रीतिची चौकशी सुरू असून या प्रकरणात अजून काही जाणांची नावं समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रीतिका चौहान हिने सावधान इंडिया, सीआयडी, संकटमोचन महाबली या मालिकांमध्ये काम केले आहे. देवो के देव महादेव या मालिकेमुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती. गेल्या काही काळापासून ती रूपेरी पडद्यापासून दूर आहे. मात्र, आता पोलीसांनी तिला गांजा घेताना रंगेहात पकडल्याने ती पुन्हा चर्चेत आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.