मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते नारायण राणे शिवसेना व महाराष्ट्र सरकारवर टीका करताना दिसत आहेत. अशातच आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना जोरदार प्रतिउत्तर दिलं. दसरा मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी राणेंचा उल्लेख बेडूक असा केला, तर नितेश राणे आणि निलेश राणे यांचा उल्लेख बेडकाची पिल्ल असा केला. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी ट्विटरवरून पलटवार केला आहे.
“दुसऱ्यांची ‘पिल्ल’ वाईट..मग यांनी काय त्या DINO च्या खुशित नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा “श्रवणबाळ” जन्माला घातला आहे का? इतकी खुम खुमी आहे ना मग ती Disha Salain ची केस मुंबई पुलिस वर कुठला ही दबाव न टाकता निपक्षपाती चौकशी करुन दया.. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!” असे ट्विट करत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?
“तुम्हाला माहिती आहे, एक बेडूक आणि त्याची दोन पोरं. या पक्षातून त्या पक्षात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यांनी बाबांना सांगितलं. बाप आवाज काढतोय पण, आवाज काही,” असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.