Nashik Lok Sabha Election| लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. मात्र अद्याप महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. नाशिक लोकसभा मतदार संघातून सध्या महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. यातच मंत्री छगन भुजबळ या मतदारसंघातून लोकसभा लढवणार असल्याच्या चर्चा सुरू झाली आहे. तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी यापूर्वीच सभेत हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली. याप्रकरणी आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ ? Nashik Lok Sabha Election|
“नाशिकसाठी शिंदे गटाचे गोडसे प्रयत्न करत आहेत ते विद्यमान खासदार आहेत. त्यांनी प्रयत्न केलाच पाहिजे. भाजपचे १०० नगरसेवक आहेत आणि त्यांचे आमदार आहेत त्यामुळे त्यांनी प्रयत्न करणं चूक नाही. ज्या कुणाला तिकिट मिळेल त्याचं काम आम्ही सगळे मिळून करणार आहोत. माझ्या नावाची जर घोषणा झाली तर.. असले प्रश्न येत नाहीत. कारण जर-तरच्या प्रश्नांना उत्तर देत नाही. ” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
येवल्यासाठी दिल्लीतून प्रयत्न करणार का? असा सवाल देखील भुजबळ यांना करण्यात आला. त्यावर “आधी तिकिट तर मिळू दे मग दिल्ली, सध्या आपण गल्लीतच आहे, गल्लीची चर्चा करु. मी कुठेही गेलो तरीही येवला आणि मी आमचं प्रेम कमी होणार नाही,” असेही भुजबळ यांनी सांगितले. Nashik Lok Sabha Election|
हेही वाचा:
धीरेंद्र शास्त्री पुन्हा एकदा वादात अडकले ; गुन्हा दाखल, वाचा नेमका काय आहे वाद ?