मुंबई – अॅक्शन, अॅडव्हेंचर आणि सस्पेन्समधून जाणारा राम सेतूचा प्रवास पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अक्षय कुमारच्या राम सेतू या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. राम सेतूचा हा अद्भुत प्रवास पाहून तुमचे मन प्रसन्न होईल. राम सेतूच्या ट्रेलरला सोशल मीडिया यूजर्सनाही पसंती मिळत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
राम सेतू पाडण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. तर दुसरीकडे अक्षय कुमार पुरातत्वशास्त्रज्ञ आहेत, ते राम सेतू वाचवण्यासाठी प्रयन्त करत आहे. 7000 वर्षे जुने सत्य शोधण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य पणाला लावले आहे.
चित्रपटाचा ट्रेलर थरारक आहे. सोशल मीडियावर यूजर्स ट्रेलरचे कौतुक करताना दिसून येत आहे. काहींनी याला उत्कृष्ट म्हटले आहे तर काहींनी याला ब्लॉकबस्टर म्हटले आहे. अनेकांच्या मनात रामभक्ती जागृत झाली आहे. एकूणच ट्रेलरने धमाल केली आहे.
राम सेतू 25 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर रिलीज होणारा राम सेतू, अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक उत्तम भेट आहे. चित्रपटाचा ट्रेलर दमदार आणि थरारक आहे. त्यामुळे लोकांची उत्कंठा आणखी वाढली आहे. चाहत्यांना चित्रपटाच्या रिलीजची प्रतीक्षा करणे अशक्य आहे.
अॅक्शन अॅडव्हेंचर फिल्म राम सेतूचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. अक्षय कुमार व्यतिरिक्त जॅकलिन फर्नांडिस, नुसरत भरुचा, सत्य देव मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट राम सेतूच्या रहस्यमय जगाचा फेरफटका मारतो. अक्षय पुरातत्वशास्त्रज्ञ (पुरातत्वशास्त्रज्ञ) झाला आहे. जो राम सेतू वाचवण्याच्या मोहिमेवर निघाला आहे.