मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई: मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. एका वृत्तवाहिनीने याविषयी वृत्त दिले आहे.

येत्या काही दिवसात दिवाळीचा सण आहे. दिवाळी हा मुंबईतला मोठा सण आहे. दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडतात. यावेळी वर्दळीच्या, गर्दीच्या ठिकाणांना दहशतवादी लक्ष्य करु शकतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईत छोट्या ड्रोन विमानांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. ३० ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर पर्यंत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या काळात मुंबईमध्ये सुरक्षा बंदोबस्त देखील वाढवला जाऊ शकतो.

सध्या संपूर्ण देशात अनलॉकचा फेज सुरु आहे. करोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. गर्दीमध्ये करोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांना मास्क घालण्यासह सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन वारंवार यंत्रणांकडून केले जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.