शहरात 12 हजार 474 रुग्ण
– सागर येवले
पुणे – शहरातील बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील आठ दिवसांपासून एकूण चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह सापडण्याचे प्रमाण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात पहिला बाधित 9 मार्च रोजी सापडला होता. यानंतर आजअखेर बाधितांची संख्या तब्बल 12 हजार 474 वर पोहचली असून, मे आणि जून महिन्यांत सर्वाधिक बाधितांची संख्या आढळून आली आहे. तर चाचण्यांमध्ये पॉझीटीव्ह सापडण्याचे प्रमाण 15 टक्क्यावरून 18 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. मार्च अखेरीस शहरात केवळ 28 बाधित सापडले होते.
एप्रिल अखेरपर्यंत दीड हजार बाधित आणि मे महिन्यात अवघ्या 30 दिवसात तब्बल साडेसहा हजार म्हणजेच बाधितांची संख्या तिप्पट वाढली आहे. 1 ते 21 जूनदरम्यान बाधितांची संख्या तब्बल साडेबाराहजारापर्यंत पोहचली. तर, सध्या शहरात दररोज चारशे बाधित सापडत आहेत.