ओतूर – आळेफाटा पोलीस ठाण्याच्या वतीने मंगळवारी (दि. 7) पोलीस ठाणे हद्दीतील विद्या विकास मंदिर राजुरी, बेल्हेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय बेल्हे, विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम साकोरी, जिल्हा परिषद शाळा वडगाव आनंद, श्रीमती रेऊबाई बाळाजी देवकर विद्यालय वडगाव आनंद (ता. जुन्नर) या शाळांमध्ये “पोलीस रेझिंग डे’ सप्ताह राबवला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते डी. बी. वाळुंज यांनी दिली.
पोलीस विभागाने 2 ते 8 जानेवारी ‘पोलीस रेझिंग डे’ साजरा करण्याच्या सुचनेनुसार शाळा- महाविद्यालयात जाऊन तेथील विद्यार्थ्यांना पोलीस विभागातील अत्याधुनिक शस्त्र, पोलीस ठाण्याअंतर्गत विविध विभागातील कामकाज तसेच वाहतुकीचे नियम या संदर्भांत माहिती देण्यात आली.
तसेच पोलीस ठाण्याकडील नियुक्त असणारे निर्भया पथकाबाबत माहिती देऊन त्यांना स्वसंरक्षणार्थ घेण्यात येणारी दक्षता, तसेच मुलींची सुरक्षितता याबाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास पोलीस निरिक्षक टी. वाय. मुजावर, अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. पोलीस नाईक बर्डे, पो.
कॉ. करे, इष्टे, नाईक, रहाणे, शिंदे, ढोबळे, हासे, पोलीस कर्मचारी आनंदगावकर व पोलीस स्टाफ हजर होता. तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामधे रेऊबाई बाळाजी देवकर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुभाष जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव आनंदचे मुख्याध्यापक सुनिल ठिकेकर तसेच सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कुऱ्हाडे, गणेश चौगुले आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
. प्रास्ताविक डी. बी. वाळुंज यांनी केले. असा शस्र दाखविणे, त्याबद्दल माहिती देणे असा कार्यक्रम शाळेच्या प्रागंणात पहिल्यांदाच झाला असल्याचे त्शंनी सांगितले. जाधव सर यांनी आभार मानले.