सोलापूर – सहकारी पोलीस मित्राच्या पत्नीला माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत शहर पोलीस दलातील एका पोलिसाने आपल्याच सहकारी पोलिस मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेप्रकरणी चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
रवी मल्लिकार्जुन भालेकर असे पोलीस शिपायाचे नाव असून चावडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. पीडित पोलीस पत्नीने या प्रकरणी चावडी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर शहर पोलिसांनी त्यास तात्काळ ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे.
शहर पोलीस दलातील एका पोलिसाला करोनाची बाधा झाली होती. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचा गैरफायदा पोलिस मित्रांने घेतला. पोलीस शिपाई रवी मल्लिकार्जुन भालेकर हा २३ मे च्या मध्यरात्री १२ वाजता सहकारी मित्राच्या घरी गेला आणि त्याच्या पत्नीवर बलात्कार केला. यावेळी त्याने माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत हा लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेचा पोलिस तपास करित आहेत.