मुंबई – मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी आता पोलीस तैनात करण्यात येणार आहे. जरांगे यांना सरकारी सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आजपासून जरांगे यांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशाने मनोज जरांगे यांना पोलीस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी 24 तास दोन सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. दरम्यान, सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांकडे मनोज जरांगे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार दोन कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी नेमण्यात आले आहेत.