भाजपच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक 16 फेब्रुवारीपासून
Updated On:

नवी दिल्ली – भाजपच्या राष्ट्रीय परिषदेची तीन दिवसीय बैठक १६ फेब्रुवारीपासून दिल्लीत होणार आहे. त्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा अजेंडा निश्चित होण्याची शक्यता आहे. पक्षाचे ८ हजारहून अधिक पदाधिकारी बैठकीत सहभागी होतील.
भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, बहुतांश केंद्रीय मंत्री आणि प्रदेश शाखांचे प्रमुख नेते पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे आगामी बैठक भाजपच्या दृष्टीने अतिशय महत्वाची मानली जात आहे.
वेळापत्रकानुसार एप्रिल-मेमध्ये लोकसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्यासाठी आता थोडा अवधी शिल्लक असल्याने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपही राष्ट्रीय परिषद बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सज्ज करण्यासाठी सरसावल्याचे दिसून येत आहे.





