PM Modi : अयोध्येत येत्या 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाबाबत देशभरात आनंदाचे वातावरण आहे. या कार्यक्रमाची विशेष तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री रामजन्मभूमी मंदिरावरील स्मरणार्थ टपाल तिकीट आणि जगभरातील प्रभू राम यांच्यावर जारी केलेल्या तिकिटांच्या पुस्तकाचे प्रकाशन केले. पीएम मोदींनी एकूण 6 तिकिटे जारी केली, ज्यात राम मंदिर, भगवान गणेश, भगवान हनुमान, जटायू, केवलराज आणि माँ शबरीची तिकिटे समाविष्ट आहेत.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
याबाबत पीएम मोदी म्हणाले, “हे टपाल तिकीट पुढील पिढीपर्यंत कल्पना, इतिहास आणि ऐतिहासिक प्रसंग पोहोचवण्याचे एक माध्यम आहे. टपाल तिकीट निघाल्यावर, कोणी पाठवलं की तो पत्र पाठवतोच पण इतिहासाचा एक भाग पत्राद्वारे इतरांपर्यंत पोहचवतो. हा केवळ कागदाचा तुकडा नाही. हे इतिहासाच्या पुस्तकांमधील फॉर्म आणि ऐतिहासिक क्षणांचे एक लहान रूप आहे. तरुण पिढीलाही त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळेल. या तिकिटांमध्ये राम मंदिराचे भव्य चित्र आहे.”
Prime Minister Narendra Modi releases Commemorative Postage Stamps on Shri Ram Janmbhoomi Mandir and a book of stamps issued on Lord Ram around the world. Components of the design include the Ram Mandir, Choupai ‘Mangal Bhavan Amangal Hari’, Sun, Sarayu River and Sculptures in… pic.twitter.com/ISBKLFORG4
— ANI (@ANI) January 18, 2024
पुढे ते म्हणाले, “पोस्टल स्टॅम्प ही मोठ्या विचारांची छोटी बँक आहे. टपाल विभागाला संतांचे मार्गदर्शन लाभले. टपाल तिकिटे कल्पना आणि ऐतिहासिक क्षण कॅप्चर करतात. पोस्टल तिकिटे पुढच्या पिढीला संदेश देतातआज, श्री रामजन्मभूमी मंदिरावरील 6 स्मरणार्थ टपाल तिकिटे आणि जगभरातील प्रभू रामावर जारी केलेल्या तिकिटांचा अल्बम प्रकाशित करण्यात आला आहे. मी देशातील जनतेचे आणि जगभरातील सर्व राम भक्तांचे अभिनंदन करू इच्छितो.”
#WATCH | Prime Minister Narendra Modi says “Today, I got the opportunity to join another event organised by Shri Ram Mandir Pran Pratishtha Abhiyan. Today, 6 Commemorative Postage Stamps on Shri Ram Janmbhoomi Mandir and an album of stamps issued on Lord Ram around the world have… https://t.co/cgSOT6MGZy pic.twitter.com/QmdB0PrGrL
— ANI (@ANI) January 18, 2024
पुस्तकात कोणत्या देशांचा समावेश
या पुस्तकामध्ये विविध देशांमधील श्रीरामावर आधारित टपाल तिकिटांचा समावेश आहे. राम मंदिर, चौपई ‘मंगल भवन अमंगल हरी’, सूर्य, सरयू नदी आणि मंदिराच्या आसपासच्या मूर्तींचे चित्रण आहे. 48 पानांच्या पुस्तकात यूएस, न्यूझीलंड, सिंगापूर, कॅनडा, कंबोडिया आणि युनायटेड नेशन्स सारख्या संस्थांसह 20 हून अधिक देशांनी जारी केलेल्या टपाल तिकिटांचा समावेश आहे.