Golmaal 5 Rohit Shetty : रोहित शेट्टीने बॉलिवूडला अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. रोहित शेट्टी सध्या सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय अभिनीत ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेब सिरीजसह लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहेत. सध्या त्यांच्याकडे अनेक प्रोजेक्ट लाइनअप आहेत, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडील एका मुलाखतीत, रोहित शेट्टीने त्याच्या भविष्यातील प्रोजेक्टबद्दल माहिती दिली यावेळी त्याने गोलमालच्या पुढील पार्टबाबत देखील भाष्य केले.
‘गोलमाल’ चित्रपटातील कॉमेडी आजही खूप पसंद केली जाते. या चित्रपटाच्या कॉमेडी क्लिप सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल’ फ्रँचायझीचा पहिला भाग ‘गोलमाल फन अनलिमिटेड’ 2006 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात शर्मन जोशी, तुषार कपूर, अर्शद वारसी आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत होते. यानंतर रोहित शेट्टीने ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल-3’ आणि ‘गोलमान अगेन’ या तीन सिक्वेलमधून बॉक्स ऑफिसवर सुपरहिट कॉमेडीचा तडका लावला होता. रोहित शेट्टीने नुकत्याच केलेल्या ‘गोलमाल 5’ च्या वक्तव्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
रोहित शेट्टीने ‘गोलमाल 5’ येत असल्याची पुष्टी केली. फ्रँचायझीला मिळालेल्या उदंड प्रतिसादाची कबुली देऊन, तो म्हणाला, आम्हाला गोलमालच्या पुढच्या भागावर लवकरात लवकर काम सुरु करायचे आहे.लवकरच त्याचा पाचवा भाग येन अपेक्षित आहे.तसेच आणि पाचवा भाग तितकाच मनोरंजन पर असला पाहिजे आणि तेवढ्या मोठ्या स्केलवर बनला पाहिजे असं देखील शेट्टी यावेळी म्हणाले.
रोहित शेट्टीने असेही स्पष्ट केले की ‘गोलमाल’ फ्रँचायझी आणि कॉप युनिव्हर्स व्यतिरिक्त तो काहीतरी नवीन करण्याचा विचार करत आहे. दिग्दर्शकाला काहीतरी वेगळं करायचं आहे. रोहित शेट्टीने अशा स्क्रिप्टची इच्छा व्यक्त केली जी त्याला ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या स्केल आणि यशाची आठवण करून देणारा चित्रपट बनवू शकेल. दरम्यान, ‘इंडियन पोलिस फोर्स’चा प्रीमियर लवकरच Amazon Prime वर होणार आहे. रोहित शेट्टी भविष्यात मोठ्या प्रमाणावर कॉमेडी आणि अॅक्शन एकत्र करून एक सिनेमॅटिक प्रोजेक्ट करण्याची तयारी देखील करत आहे.