PM Modi Donates Land। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मनाची श्रीमंती दाखवलीय. गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये असलेला त्यांचा भूखंड त्यांनी दान केलाय. मोदींनी हा भूखंड ‘नादब्रह्म कला केंद्रा’च्या स्थापनेसाठी दान केला. भारताच्या सांस्कृतिक वारशाबद्दल आदर आणि वचनबद्धता व्यक्त करत पंतप्रधान मोदींनी ही जमीन दान केली. ही जमीन पीएम मोदी आणि दिवंगत भाजप नेते अरुण जेटली यांना देण्यात आली होती.
पीएम मोदींनी दान केलेला भूखंड गांधीनगरच्या सेक्टर-१ मध्ये आहे. आता याठिकाणी नादब्रह्म कला केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. ही इमारत संगीत क्षेत्राच्या प्रगतीसाठी तयार करण्यात येतीय. ही जमीन मुळात सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी आणि भाजप नेते अरुण जेटली यांना देण्यात आली होती. मात्र, आता ही जमीन नादब्रह्म संस्थेच्या स्थापनेची जबाबदारी सांभाळणाऱ्या मनमंदिर फाउंडेशनकडे सोपवण्यात आले आहे. फाउंडेशन याठिकाणी उत्कृष्ट कला केंद्र उभारणार आहे.
नादब्रह्म कला केंद्र हे संगीताचे प्रमुख केंद्र बनेल PM Modi Donates Land।
फ्री प्रेस जर्नलच्या अहवालानुसार, मनमंदिर फाउंडेशनच्या देखरेखीखाली बांधण्यात येणारे नादब्रह्म कला केंद्र संगीताचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल. याठिकाणी भारतीय संगीत कलेच्या सर्व पैलूंबद्दल सर्वसमावेशक माहिती दिली जाईल. भारतीय संगीतातील वैविध्यपूर्ण शैली आणि परंपरा लक्षात घेऊन त्याचा प्रसार करण्याच्या उद्देशाने या केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. सं
नादब्रह्म कला केंद्र १६ मजली असेल PM Modi Donates Land।
नुकतेच मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गुजरात भाजपचे प्रमुख यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींनी दान केलेल्या जमिनीचे भूमिपूजन करण्यात आले. या शुभमुहूर्तावर प्रस्तावित नादब्रह्म केंद्राच्या बांधकाम प्रक्रियेला औपचारिक सुरुवात करण्यात आली. नादब्रह्म केंद्र 16 मजली असेल. गांधीनगरमध्ये नादब्रह्म केंद्र एकदा पूर्ण झाल्यावर भारतीय संगीत कला क्षेत्रातील एक प्रमुख केंद्र म्हणून नावारूपाला येईल.