Siddharth Malhotra| बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्याच्या ‘शेरशाह’ या चित्रपटाला मोठी लोकप्रियता मिळाली. यातील त्याच्या अभिनयाचे देखील कौतुक करण्यात आले. या चित्रपटानंतर आता सिद्धार्थ ‘योद्धा’ सिनेमात झळकणार आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच सिद्धार्थ चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमासाठी दिल्लीला आला होता.
यावेळी त्याने पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना देशभक्तीपर असे गणवेशातील चित्रपट करण्यामागचे कारण सांगितले. ” “एका पाठोपाठ एक देशभक्तीपर चित्रपटांची निवड करणे हे फक्त योगायोगाने घडले आहे. माझे कदाचित गणवेशाकडे थोडे जास्त आकर्षण आहे. माणूस गणवेशापेक्षा दुसऱ्या कोणत्याही कपड्यात जास्त शोभून दिसत नाही. पण चित्रपटातला गणवेश हा एक काल्पनिक असतो. मी आधी लष्करी अधिकाऱ्याच्या गणवेशात नंतर पोलिसांच्या गणवेशात दिसलो आणि आता पुन्हा या चित्रपटातही मी गणवेशात दिसणार आहे.” Siddharth Malhotra|
पुढे सिद्धार्थ म्हणाला की, “या चित्रपटाचा विषय गंभीर जरी असला तरीही यात रोमान्स आहे. जर तुम्ही ट्रेलर पाहिला असेल तर ‘योद्धा’मध्ये लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे.” यावेळी त्याने करण जोहरकडे त्याच्या पुढील चित्रपटाबाबत देखील गंमतीशीररित्या विचारणा केली. Siddharth Malhotra|
‘आपण येथे धर्मा प्रोडक्शन चित्रपटाचं प्रमोशन करतोय तर कदाचित तुम्ही करण जोहरला विचारू शकता की तो माझ्यासाठी त्याचा पुढचा रोमँटिक चित्रपट कधी बनवणार आहे? असा सवाल त्याने करणला केला. दरम्यान, ‘शेरशाह’, ‘इंडियन पोलीस फोर्स’ नंतर आता पुन्हा ‘योद्धा’ चित्रपटात सिद्धार्थ गणवेशात दिसणार आहे. येत्या 15 मार्च 2024 रोजी योद्धा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा:
Rashmika Mandanna । रश्मिका मंदान्नाच्या ‘पिंक टोपी’ने उघड केले तिचे नाते!