PM in Jammu Kashmir | पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 20 फेब्रुवारीला जम्मू दौऱ्यावर जाणारेत. याआधी शनिवारी, अधिकाऱ्यांनी फ्लाइंग ड्रोन, पॅराग्लायडर आणि रिमोट-नियंत्रित मायक्रो-लाइट एअरक्राफ्टवर तात्पुरती बंदी घातलीय.
पंतप्रधानांच्या जम्मू दौऱ्याविषयी प्रवक्त्याने याविषयी माहिती दिली. जम्मूचे जिल्हा दंडाधिकारी सचिन कुमार वैश यांना संभाव्य सुरक्षा धोक्यांशी संबंधित गुप्तचर अहवाल प्राप्त झालाय, त्यानंतर त्यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 अंतर्गत हा आदेश जारी केला. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी केल्यानंतर हा आदेश औपचारिकपणे अंमलात आणला, जो 20 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
आदेशाचा दाखला देत प्रवक्त्याने सांगितले की, जम्मूमध्ये ड्रोन, रिमोट-नियंत्रित मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा-मोटर, हँड ग्लायडर आणि हॉट एअर बलूनवर बंदी असेल.
निर्बंधातून कोणाला सूट ? PM in Jammu Kashmir |
दहशतवादी आणि देशविरोधींच्या संभाव्य कारवायांना रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही पावले उचलण्यात आलीय. पंतप्रधान तसेच व्हीव्हीआयपींच्या भेटीदरम्यान सुरक्षा दलांनी केलेल्या हवाई निगराणीचा देखील समावेश असणार आहे, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, संरक्षण आणि निमलष्करी दलांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये दंडात्मक कारवाई होऊ शकते.
पंतप्रधान जनसभेला संबोधित करणार PM in Jammu Kashmir |
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात रॅलीला संबोधित करतील. कटरा-दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा थांबा पाहण्यासाठी उधमपूर या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात गेले असता त्यांनी हे वक्तव्य केले होते. इथल्या परिसरातील लोकांच्या सोयीसाठी उधमपूर आणि कठुआ रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट एक्स्प्रेसचा थांबा देखील सुरू करण्यात आला आहे.