Anita Date : अभिनेत्री अनिता दाते ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहचली होती. या मालिकेनंतर ती ‘नवा गडी नवं राज्य’ यात रमाच्या भूमिकेत दिसली होती. आता अनिता दाते लवकरच कलर्स मराठीवरील एका नव्या कोऱ्या मालिकेत काम करताना दिसणार आहे. ‘इंद्रायणी’ या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेत ती संदीप पाठकसोबत झळकणार आहे.
तर या मालिकेत बालकलाकार सांची भोईर देखील झळकणार आहे. ‘कलर्स मराठी’च्या या नव्या मालिकेच्या नव्या टीझरवर प्रेक्षकांसह मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ‘इंद्रायणी’मालिकेच्या टीझरवर कमेंट करतअमृता खानविलकर, स्पृहा जोशी, अक्षय केळकर, सुकन्या मोने या कलाकारांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या २५ मार्चपासून ही मालिका प्रसारित होणार आहे. मात्र ही मालिका नेमकी कोणत्या वेळेत प्रसारित केली जाणार आहे, याबाबत अद्यापही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
View this post on Instagram
दरम्यान, अनिता दातेने मालिकांसह चित्रपटात देखील काम केले आहे. अनिता दातेचा ‘वाळवी’ हा चित्रपट प्रेक्षकांना फार आवडला होता. त्यानंतर तिने नाटकामध्ये देखील काम केले आहे. यानंतर आता ती पुन्हा एकदा मालिकेमध्ये काम करण्यास सज्ज झाली आहे. संदीप पाठकसोबत ती यात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अनिताची ही मालिका आता प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का? हे पाहावे लागणार आहे.