हॅमिल्टन : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. हॅमिल्टन येथे मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामना होत आहे. न्यूझीलंड कर्णधार टाॅम लॅथम याने क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे. भारतीय संघाने टी-२० मालिकेत न्यूझीलंडला व्हॉइट वॉश (५-०) दिला होता. त्यामुळे यजमान संघासाठी एकदिवसीय मालिका अत्यंत महत्त्वाची आहे.
एकदिवसीय सामन्यातील नियमित सलामीवीर शिखर धवन, रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघाला मालिकेपूर्वी मोठा धक्का बसला. पण आजच्या सामन्यात रोहित, धवन ऐवजी सलामीवीर म्हणून पृथ्वी शाॅ आणि मयांक अग्रवाल यांना संधी मिळाली आहे. तर यष्टीरक्षक म्हणून लोकेश राहुलवरच जबाबदारी सोपविण्यात आली आहे. रविंद्र जडेजा, केदार यादव यानांही संघात स्थान मिळालं आहे.
1st ODI. India XI: M Agarwal, P Shaw, V Kohli, S Iyer, KL Rahul, K Jadhav, R Jadeja, S Thakur, K Yadav, M Shami, J Bumrah https://t.co/ewSrnDR7hO #NZvInd
— BCCI (@BCCI) February 5, 2020
भारतीय संघ : पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, केदार जाधव, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी
दुसरीकडे न्यूझीलंड संघ कर्णधार केन विलियम्सनविना मैदानात उतरणार आहे. तो दुखापतग्रस्त आहे. विलियम्सनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम संघाचे नेतृत्व करत आहे.तर यष्टिरक्षक फलंदाज टॉम ब्लंडेल यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
1st ODI. New Zealand XI: M Guptill, H Nicholls, T Blundell, R Taylor, T Latham, J Neesham, C de Grandhomme, M Santner, I Sodhi, T Southee, H Bennett https://t.co/ewSrnDR7hO #NZvInd
— BCCI (@BCCI) February 5, 2020
न्यूझीलंड संघ : मार्टिन गप्टिल, हेनरी निकोल्स, टॉम लाथम, रॉस टेलर, कॉलिन डी ग्रैंडहोम, जेम्स नीशम, टॉम ब्लंडेल, मिचेल सैंटनर, टिम साउदी, ईश सोढ़ी, हेमिश बेनेट.
दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघासाठी ही तिसरी एकदिवसीय सामन्यांची मालिका आहे. संघाने यापूर्वी विदेशातील वेस्ट इंडिज आणि मायदेशातील मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. दुसरीकडे न्यूझीलंड संघ विश्वचषक स्पर्धेत उपविजेता ठरल्यानंतर पहिल्यांदाच एकदिवसीय लढत खेळत आहे.