मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज उत्कर्ष, स्नेहा आणि जय एका गोष्टीवर चर्चा करताना दिसणार आहेत. ज्यामध्ये उत्कर्ष त्याचे मत मांडताना म्हणणार आहे “Play like a player”.
नक्की ही चर्चा का आणि कशावरून सुरू झाली ? हे आजच्या भागामध्ये आपल्याला कळेलच. पण एवढं नक्की की घरातील सगळीच समीकरण हळूहळू बदलताना दिसतं आहेत.
तिघांची चर्चा सुरू असताना स्नेहाचं म्हणण जयने उत्कर्षला सांगताना म्हणाला, तिचं म्हणण आहे की मीरा आणि गायत्रीने परत तेच केलं जे त्यांनी सुरेखाताईंच्या वेळेला झाला होतं. तर मी तिला तेचं म्हंटलं की बिग बॉस सगळ्यांना समान संधी देतात.
वेट फॉर यूर टर्न. आज जर तू कॅप्टन झालीस तर मग सहा ते सात दिवस बॉल इज इन यूर कोर्ट.” उत्कर्षचे त्यावर म्हणणे आहे “मला काय पटतं सांगू का मी स्पर्धक म्हणून सांगतो, “Play like a player”.