दिव्यांग खेळाडूला मनसेची मदत
पुणे : गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक मदती अभावी देशविदेशतील स्पर्धांपासून वंचित राहिलेल्या दिव्यांग पॅरा बॅडमिंटन पटू आरती पाटील यांची मनसेच्या महिला शहराध्यक्ष वनीता वागस्करयांनी नुकतीच भेट घेतली. तसेच तील भविष्यातील स्पर्धांच्या तयारीसाठी मनसेच्या वतीने 2 लाख रूपयांची मदत यावेळी वागसकर यांच्या वतीने देण्यात आली.
पॅरा बॅडमिंटन पटू पाटील या 2024 च्या पॅरा ऑलिंपिक स्पर्धेसाठी तयारी करत आहेत. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना या स्पर्धेपूर्वी परदेशातील स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे लागणार आहे, तर पुढील महिन्यात युगांडा येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी त्या तयारी करत आहेत. ही माहीती मिळाल्यानंतर वागसकर यांनी महापालिकेच्या सणस मैदानात पाटील यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी पाटील यांचे प्रशिक्षक अजय रावळ रोहित दीक्षित संदीप डांगे यांच्याशी सविस्तर चर्चा केली असता ती आतापर्यंत होत असलेल्या अनेक परदेशातील स्पर्धाना खेळातील गुणवत्ता असूनही आर्थिक परिस्तिथी मुळे जाऊ शकलेली नसल्याचे सांगितले.
त्यानंतर वागस्कर यांनी तत्काळ या स्पर्धांच्या तयारीसाठी मदत म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच रीती फोर्ब्स यांच्या माध्यमातून 2 लाखाची मदत करण्यात आली आहे . यापुढेही महाराष्ट्र नवनिर्माण महिला पाटील यांना मदत करणार असल्याचे वागस्कर यांनी सांगितले. मनसेचे संतोष पाटील , विक्रांत पाटील उपस्थित होते.