मुंबई – तब्बल 8 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ‘एक व्हिलन रिटर्न्स’ची कथा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये अभिनेता अर्जुन कपूर, अभिनेता जॉन अब्राहम, अभिनेत्री तारा सुतारिया आणि अभिनेत्री दिशा पटानी दमदार भूमिकेत दिसत आहेत.
View this post on Instagram
ट्रेलर पाहून स्टार्सचे कौतुक होत आहे मात्र असे असले तरी दुसरीकडे दिशाच्या बदलेल्या चेहऱ्यामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. दिशा ट्रेलर लॉन्चला लाँग फिटेड स्कर्ट आणि काळ्या रंगाचा क्रॉप टॉप घालून पोहोचली. ब्लॅक आउटफिट, ग्लॉसी मेकअप आणि ओपन हेअरस्टाईलमध्ये ती सुंदर दिसत होती.
पण दिशांच्या फॅन्सने तिच्या बदलेल्या चेहऱ्यमुळे प्लास्टिक सर्जरी केली असल्याची चर्चा आहे. ट्रेलर लॉन्चच्या वेळी दिशाला पाहून अनेकांनी दावा केला की तिने नाक आणि ओठांची प्लास्टिक सर्जरी केली आहे.
दिशाला पाहून चाहते सोशलवर आपले मत मांडत आहे . एका युजर्सने म्हटले आहे की,’किती सुंदर असायचं. आता काय झालं.’ तर दुसऱ्या एक युजर्सने म्हटले आहे,’ प्लास्टिक सर्जरीचे दुकान’. अशा अनेक प्रतिक्रिया सध्या सोशल चर्चेत आहे. दिशा पुन्हा एकदा बदलेल्या चेहऱ्यामुळे ट्रोल होत आहे.