Lapata Ladies On OTT| बॉलीवूड अभिनेता आमिर खानने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आमिर खानची दुसरी पत्नी किरण राव या देखील दिग्दर्शिका आहेत. नुकताच त्यांचा ‘लापता लेडीज’ चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फार कमाई करता आली नाही. यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर दर्शित होण्यास सज्ज झाला आहे.
महिला सक्षमीकरणावर भाष्य करणारा हा चित्रपट असून 1 मार्च रोजी रिलीज झाला होता. यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आज 26 एप्रिलपासून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
View this post on Instagram
‘लापता लेडीज’ या चित्रपटाची निर्मिती आमिर खानने केली आहे. त्याचबरोबर या चित्रपटात प्रतिभा रंता, नितांशी गोयल, स्पर्श श्रीवास्तव, रवी किशन, छाया कदम यांच्यासह अनेक कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 21 कोटींहून अधिकरुपयांची कमाई केली होती.
दरम्यान, किरण राव आणि आमिर खानने 2005 मध्ये लग्न केले होते. तब्बल 16 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. आजही आमिर आणि किरण एकत्र काम करताना दिसतात. याशिवाय अनेक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र सहभागी होतात. काही दिवसांपूर्वीच त्यांचे एकत्र ट्रीप गेल्याचे फोटोही समोर आले होते. Lapata Ladies On OTT|
हेही वाचा :