Dabang Delhi K.C. vs Puneri Paltan, Pro Kabaddi League 2023-24 in Delhi | प्रो कबड्डी लीग 2023-24 च्या प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पुणेरी पलटण हा दुसरा संघ ठरला आहे. पूर्वार्धात आठ गुणांनी पिछाडीवर असतानाही, पुणेरी पलटणने उत्तरार्धाच्या शेवटच्या मिनिटांत शानदार पुनरागमन केले आणि सोमवारी त्यागराज इनडोअर स्टेडियम, नवी दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या मोसमातील 107व्या सामन्यात दबंग दिल्लीविरूध्दची लढत 30-30 ने बरोबरी सोडवली. पुणेरी पलटणसाठी कर्णधार अस्लम इनामदारने सुपर-10 तर दिल्लीचा कर्णधार आशू मलिकने संघासाठी आठ गुण मिळवले.
𝐏𝐔𝐍𝐄𝐑𝐈 𝐏𝐀𝐋𝐓𝐀𝐍 𝐌𝐀𝐊𝐄 𝐓𝐇𝐄 𝐏𝐋𝐀𝐘𝐎𝐅𝐅𝐒 👏
The Paltan hold Dabang Delhi K.C. to a 30-30 tie 🤯 in an enthralling encounter 😍#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #DELvPUN #DabangDelhiKC #PuneriPaltan pic.twitter.com/p6a6iREez2
— ProKabaddi (@ProKabaddi) February 5, 2024
स्पर्धेतील 17 सामन्यांमध्ये तिसऱ्यांदा बरोबरी खेळल्यानंतर पुणेरी पलटणचे 71 गुण झाले असून या मोसमात प्लेऑफसाठी पात्र ठरणारा दुसरा संघ ठरला आहे. जयपूर पिंक पँथर्सनेही याआधीच पात्रता मिळवली आहे.
#PKLSeason10 (#JPPvPAT Match 106) : बलाढ्य जयपूरला पाटणाचा पराभवाचा धक्का…
दबंग दिल्ली संघाने 19 सामन्यांत तिसरा सामना बरोबरीत सोडवल्यानंतर गुणतालिकेत 68 गुणांसह तिसऱ्या स्थान पटकावले आहे. आज दिल्ली जिंकली असती तर प्लेऑफसाठी पात्र ठरले असते, पण शेवटच्या सेकंदात कर्णधार आशू मलिकची चूक संघाला महागात पडली. गेमच्या शेवटच्या सेकंदात आशूला टॅकल केले गेले आणि सामना 30-30 असा बरोबरीत राहिला. आशूची ही चूक दबंग दिल्लीला महागात पडली आणि आठ गुणांनी पिछाडीवर असताना पुणेरी पलटणने सामना बरोबरीत सोडवला. यासह पुणेरी पलटण प्लेऑफसाठी पात्र ठरले.