पैशांसाठी विवाहितेचा छळ; दारुड्या पतीविरोधात गुन्हा

पिंपरी – दररोजच्या खर्चासाठी व गाडी घेण्यसाठी माहेरहून पैसे आण म्हणून विवाहितेला दारु पिऊन सतत शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना मोशी येथील आनंदनगर परिसरात उघडकीस आली आहे.

याप्रकरणी पिडीत विवाहितेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन गणेश लहु राठोड (वय-34, रा. आनंदनगर, मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेला मागील वर्षभरापासून तिचा पती गणेश याने दारु पिऊन येवून शिवीगाळ व मारहाण केली. तसेच पिडीत महिलेला तिच्या वडीलांकडून रोजच्या खर्चाकरीता व गाडी घेण्यासाठी पैसे घेवून ये म्हणून मारहाण व शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बांबळे हे करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)