पिंपरी – पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन व काचेचा ग्लास मारुन जखमी केल्याची घटना 29 मे रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जगताप डेअरीच्या “ड’ प्रभाग ऑफिसजवळ घडली. मुलाच्या वडिलांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी रोहित पटेल, शरद सोनावणे (दोघ रा. जगताप डेअरी “ड’ प्रभाग कार्यालयाजवळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 वर्षीय मुलाला आरोपींनी जबरदस्तीने त्यांच्या जगताप डेअरी येथील रुमवर नेऊन मारहाण केली, तसेच काचेचा ग्लास हातावर मारुन जखमी केले.