पिंपरी -“उद्या पासून इथे टपरी दिसता कामा नये’ असे म्हणून एका विक्रेत्याला टपरीच्या बाहेर ओढून मारहाण करण्यात आली. ही घटना चिखली येथील घरकुल कमानीजवळ घडली. जमील बाबुमिया शहा (वय-35) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार विशाल दशरथ शिंदे (वय-23 रा. अशिर्वाद सोसायटी, घरकुल चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विशालने “उद्यापासून इथे तुझी टपरी दिसता कामा नये’ असे म्हणून फिर्यादीस मारहाण केली.