फसवणूक करुन मृत्यूपत्रावर अगंठा

पिंपरी -फसवणूक करून मृत्यूपत्रावर चलाखीने अंगठा घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एकावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय नामदेव सोनवणे (वय – 48 रा. कृष्णानगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली असून उत्तम नामदेव सोनवणे (वय-55 रा. त्रिवेणीनगर, तळवडे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे भाऊ आहेत. फिर्यादी यांचे वडील नामदेव सोनवणे यांच्या अशिक्षीतपणाचा फायदा घेत उत्तम याने चलाखीने मृत्यूपत्रावर अंगठा घेत फसवणूक केली अशी तक्रार फिर्यादीने दिल्यानुसार चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.