तरुणाला किरकोळ कारणावरून मारहाण

पिंपरी – माझ्याकडे रागाने का बघतोस म्हणून विचारणा केली असता तरुणाला दोघांनी लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. ही घटना बावधन येथे घडली. याप्रकरणी प्रसाद दत्तात्रय फोके (वय-19 रा. वारजे माळवाडी) याने फिर्याद दिली असून रितेश महादेव अडागळे (रा. बावधन), रोहीत महादेव अडागळे (रा. बाधवन) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद हा त्याच्या मित्रा सोबत बोलत उभा असताना रितेश त्याच्याकडे रागाने बघत उभा होता. यावेळी प्रसादने त्याला हाटकले असता अडागळे भावांनी लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. हिंडवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.