पिंपरी : अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पिंपरी – अल्पवयीन विद्यार्थीनीचा पाठलाग करुन अश्‍लिल गाणी म्हणून विनयभंग करणाऱ्या तरुणावर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली असून धिरज विलास निटुरे (रा. मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही शाळेतून घरी येत असताना आरोपी हा तिचा पाठलाग करुन त्रास देत होता. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.