‘लिव्ह इन’ मधील मैत्रिणीस मारहाण

पिंपरी -गेल्या पाच वर्षांपासून लिव्ह ऍन्ड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मैत्रिणीस मारहाण करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना डुडुळगाव येथे गुरुवारी (दि. 15) रात्री घडली. तृप्ती शालीग्राम बावीस्कर (वय-28, रा. डुडुळगाव) असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संतोष भारत तायडे (वय-28, रा. कारेगाव-रांजणगाव) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. संतोष आणि तृप्ती हे गेल्या पाच वर्षांपासून लिव्ह ऍन्ड रिलेशनशिपमध्ये राहतात. गुरुवारी रात्री त्यांच्यात भांडण झाले. यावेळी आरोपी संतोष याने तृप्तीला मारहाण करून जखमी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)