पिंपरी – कंपनीचे शटर आणि पत्रा उचकटून चोरट्यांनी चार लाख 31 हजार 755 रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना भोसरी एमआयडीसी येथे शुक्रवारी (दि. 16) सकाळी उघडकीस आली. मयुरेश माणिक सुतार (वय-31, रा. दिगंबरा रेसिडन्सी, नागेश्वर कॉलनी, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरेश यांची भोसरी एमआयडीसी येथे मोंगा स्ट्रिफिल्ड प्रा. लि. नावाची कंपनी आहे. ही कंपनी 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान बंद होती. दरम्यान चोरट्यांनी कंपनीचे शटर आणि पत्रा उचकटून आतील चार लाख 31 हजार 755 रुपयांचे कॉपरचे साहित्य चोरून नेले.