पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने 18 वर्षांवरील नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. आज (दि. 11) शहरातील 62 केंद्रांववर कोविशिल्ड लसीची मात्रा देण्यात येणार आहे. कोविशिल्ड लसीबरोबरच शहरातील आठ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे.
शनिवारी (दि. 11) शहरातील 18 ते 44 वर्ष व 45 वर्षांवरील नागरिकांना 62 केंद्रावर कोविशिल्ड लस दिली जाणार आहे. त्यापैकी 10 केंद्रांवर 700 डोस उपलब्ध असणार आहे. तर उर्वरित केंद्रांवर प्रत्येकी 300 डोस उपलब्ध असणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर 5 लाभार्थी हे ऑनलाईन स्लॉट बुकिंग केलेले तर 20 किऑस्क टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे.
तसेच उर्वरित नागरिकांना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍपनुसार लस दिली जाणार आहे. या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. तसेच इतर आठ केंद्रावर कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. या केंद्रांवर प्रत्येकी 400 डोस उपलब्ध आहेत.