पिंपरी – मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळविला. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर भाजपाच्या वतीने मोरवाडी येथील मध्यवर्ती कार्यालयात विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी हलगीवर ठेका धरला; तर महिलांनी फुगडी घातली. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘जय श्रीराम’, भाजपच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.
भाजपला मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वास आणि विकास या धोरणामुळे मिळाले आहे. येत्या काळात पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असा विश्वास शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केला.
विजयाचा आनंदोत्सव साजरा करत, पदाधिकार्यांनी एकमेकांना पेढा भरवत नागरिकांनादेखील पेढे वाटले. यावेळी शहराध्यक्ष शंकर जगताप, सुजाता पालांडे, तुषार हिंगे, शारदा सोनवणे, मोरेश्वर शेंडगे, सागर अंगोळकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.