Travis Head Water Boy In RCB : ट्रॅव्हिस हेडने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत अनेक स्फोटक खेळी खेळल्या आहेत. तो यंदा गोलंदाजासाठी कर्दनकाळ ठरतोय. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या 57 व्या सामन्यात, हेडने शानदार खेळी खेळली आणि 30 चेंडूत 8 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 89* धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने स्फोटक फलंदाजीचे प्रदर्शन करण्याची ही या मोसमातील पहिलीच वेळ नाही, तर सुरुवातीपासूनच तो अशी फलंदाजी करताना दिसत आहे. पण हाच ट्रेविड हेड एकवेळ आरसीबीमध्ये ‘वॉटर बॉय’ होता.
हैदराबादकडून खेळण्यापूर्वी ट्रेव्हिड हेड 2016 आणि 2017 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होता. त्याला आरसीबीकडून जास्त संधी मिळाल्या नाहीत. सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हेड पाण्याची बाटली धरलेला दिसत आहे. फोटो शेअर करताना लिहिले होते, ” विश्वास ठेवा, ट्रॅव्हिस हेड आरसीबीमध्ये वॉटर बाय होता.” फोटोमध्ये, हेड बंगळुरूचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्ससोबत सीमारेषेजवळ पाण्याची बाटली धरून उभा असल्याचे दिसत आहे.
Trust me Travis head was water boy in RCB lol pic.twitter.com/XiCJB8coip
— Kevin (@imkevin149) May 8, 2024
दरम्यान, हेड दोन वर्षे (2016 आणि 2017) आरसीबीचा भाग होता. मात्र, त्याला दोन वर्षांत केवळ 10 सामने खेळायला मिळाले. 10 सामन्यांमध्ये फलंदाजी करताना, हेडने 29.29 च्या सरासरीने आणि 138.51 च्या स्ट्राइक रेटने 205 धावा केल्या, ज्यामध्ये त्याचा उच्च स्कोअर 75* धावा होता. हेड 2017 नंतर आयपीएलचा भाग नव्हता.
यानंतर, आयपीएल 2024 साठी झालेल्या मिनी लिलावात, हेडला सनरायझर्स हैदराबादने 6.80 कोटी रुपयांना विकत घेतले. या मोसमात ऑस्ट्रेलियन फलंदाज हैदराबादसाठी खूप यशस्वी ठरला आहे. हैदराबादच्या सलामीची जबाबदारी हेडने घेतली. तो संघासाठी यशस्वी सलामीवीर असल्याचे सिद्ध झाले.
आयपीएल 2024 मध्ये हेडची कामगिरी…
हेडने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 11 डावांमध्ये त्याने 53.30 च्या सरासरीने आणि 201.89 च्या स्ट्राइक रेटने 533 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 1 शतक आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत. त्याने 61 चौकार आणि 31 षटकार मारले आहेत.