पिंपरी – पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सात खाजगी चार्जिंग स्टेशन्स बसवण्यात येणार आहेत. अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, हिंजवडी फेज 2 येथे यापैकी एका चार्जिंग स्टेशनवर आधीच बांधकाम सुरू झाले आहे. तर निगडी भक्तीशक्ती व भोसरी येथे खासगी वाहने चार्जिंगसाठी नवीन चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत. ही स्थानके दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी 24 तास चार्जिंगची सुविधा देतील.
1,750 बसेसच्या ताफ्यासह, झचझचङ पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात सार्वजनिक वाहतूक सेवा देते. दररोज, अंदाजे 11 ते 12 लाख प्रवासी प्रवास करतात यामधून पीएमपीला सरासरी दररोज 1.6 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. पार्यावरणपूरक धोरणामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ताफ्यात नवीन इलेक्ट्रीक वाहनांचा समावेश केला जात आहे.
महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांना ये-जा करण्यासाठी ही वाहनसेवा पुरविली जाते. याच धर्तीवर पीएमपीच्या ताफ्यातही इलेक्ट्रिीक वाहनांची भर पडत आहे. मात्र. वाहनांची संख्या पाहता, चार्जिंग स्टेशन्सची संख्या अपुरी आहे. त्यामुळेनव्याने चार्जिंग स्टेशन्स विकसित केली जाणार आहेत. भोसरी, कात्रज, बाणेर-सूस रोड, पुलगेट, डेक्कन जिमखाना, भक्ती-शक्ती निगडी आणि भोसरी येथे अतिरिक्त स्थानके असतील.
अदानी समूह ही चार्जिंग स्टेशन्स पीएमपीएमएलच्या मालकीच्या जागेवर उभारणार असून, पीएमपीला 32.5 टक्के नफा मिळणार आहे. पीएमपीएमएलच्या एका वरिष्ठ अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, तिकीट विक्रीबाहेरील उत्पन्नाला चालना देण्यासाठी पीएमपीएमएलच्या सात ठिकाणी ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स बसवण्यात येत आहेत. हिंजवडी फेज 2 येथे एका चार्जिंग स्टेशनचे बांधकाम सुरू झाले आहे.