तीन जणांचा मृत्यू : 121 रुगणांना डिस्चार्ज
पिंपरी -पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज 111 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला. शहरामध्ये आजपर्यंत 95961 जणांना करोनाची लागण झाली.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 111 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची आज नोंद झाली नाही. दिवसभरात शहरातील 3 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2462 झाली आहे. आज शहरातील बिजलीनगर, काळवाडी व दिघी येथील तीन पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला.
आज दिवसभरात 121 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 92512 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 1778 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 839 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 747 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 957 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेले रुग्णांची संख्या 1704 इतकी आहे.