पिंपरी – पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून फेब्रुवारी महिन्यात पक्की अनुज्ञाप्ती काढण्यासाठी शिबिर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी माहिती दिली आहे. ५ फेब्रुवारीपासून २९ फेब्रुवारीपर्यंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना ३१ जानेवारीपर्यंत स्लाॅट बुकिंग करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत पक्की अनुज्ञाप्ती काढण्यासाठी शिबिरामध्ये जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सध्या नवीन शिबिर आयोजित करून पक्क्या अनुज्ञाप्तीची रखडलेली कामे पूर्ण केली जाणार आहेत.
सध्या खेड येथे 5 व 6 फेब्रुवारी, मंचर येथे 12 व 13 फेब्रुवारी, जुन्नर येथे 21 व 22 फेब्रुवारी, वडगाव मावळ येथे 26 व 27 फेब्रुवारी, तर लोणावळा येथे 28 व 29 फेब्रुवारी या दिवशी पक्की अनुज्ञाप्ती शिबिर दौरा होणार आहे.
पक्क्या अनुज्ञाप्तीचा कोटा 31 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी 31 जानेवारी रोजी सायंकाळी 5 नंतर स्लॉट बुकिंग करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.