पिंपरी – पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सुमारे 22 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस पिंपरी-चिंचवड व लोहगाव भागात (36 मिमी) झाला. पुढचे चार दिवस (27 सप्टेंबरपर्यंत) वेधशाळाने पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे.
शुक्रवारी संपूर्ण जिल्ह्यात बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावली. पाऊस दिवसभर संततधार सुरू होता. तसेच, शनिवारीही पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली, आणि दिवसभर पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात होता. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी 22 मिमी पावसाची नोंद झाली. तर चिंचवडमध्ये सर्वाधिक 36.5 मिमी इतका पाऊस झाला आहे. पुणे वेधशाळेने 27 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण जिल्ह्याला यलो अलर्टचा इशारा दिला आहे.