पिंपळे गुरव – भाजपचे सांगवी रहाटणी मंडळाचे उपाध्यक्ष ललित म्हसेकर यांच्या मागणीनुसार व भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून पिंपळे गुरव ते श्री क्षेत्र नारायणपूर बस सेवा सासवड मार्गे सुरू करण्यात आली आहे.
सुभाष काटे, उद्धव कवडे, रमेश काशीद, रमेश जगताप, सूर्यकांत गोफने, संजय मराठे, उमेश बोरसे, सखाराम रेडेकर, सचिन थोरवे, सागर बाविस्कर तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते बसचे पूजन करणयात आले. हा सोहळा पिंपळे गुरव बस स्थानकाजवळ करण्यात आला. या वेळी भाजप शहरध्यक्ष शंकर जगताप यांचे सर्व भक्तांकडून मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
श्री दत्तगुरूंच्या नामस्मरणाने बसचे स्वागत करण्यात आले. या बसमुळे पिंपळे गुरव, नवी सांगवी, जुनी सांगवी, दापोडी भागातील नागरिकांना नारायणपूर येथे श्री दत्त महाराजांच्या दर्शनाला जाता येणार आहे. या बस सेवेचा मार्ग पिंपळे गुरव ते श्री क्षेत्र नारायणपूर जाणार्या भाविकांच्या सोयीसाठी दर गुरुवारी व पौर्णिमेच्या दिवशी बस मार्ग क्रमांक 18 वाय पिंपळे गुरव ते श्री क्षेत्र नारायणपूर खडकी बाजार, पुणे स्टेशन, हडपसर, सासवड मार्गी सुरू करण्यात आलेली आहे.
या वेळी पिंपळे गुरव ते श्री क्षेत्र नारायणपूर बसचालकांचा सन्मान नारायणपूर श्री दत्त मंदिर येथे उद्योजक विजय जगताप व मित्र परिवार यांच्या हस्ते करण्यात आला.गाडीची वेळ गुरुवारी सकाळी 7 वाजता आहे.