पिंपरी आरटीओच्या 23 पदांना मुदतवाढ

गृहविभागाचा निर्णय : 30 सप्टेंबरपर्यंत मुदत

पिंपरी – पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत एकूण 76 पदांना 30 सप्टेंबरपर्यंत मुतदवाढ देण्यात आली आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील एकूण 23 पदांचा समावेश आहे. राज्याच्या गृह विभागाने या मुदतवाढीला नुकतीच मान्यता दिली आहे. राज्यभरातील एकूण 812 अस्थायी पदांना 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील एकूण 23 पदांचा समावेश होता. ही मुदत संपल्यानंतर पुन्हा या पदांना मुदतवाढ देण्याचे प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन होते. त्यानुसार 30 सप्टेंबर 2019 पर्यंत या सर्व पदांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड कार्यालयात सर्वाधिक मोटार वाहन निरीक्षकांच्या पदांना मुदतवाढ देण्यात आली आहे. ही संख्या पाच इतकी आहे. याखालोखाल वरिष्ठ श्रेणी लिपिक, सहाय्यक रोखपाल, वाहनचालक, शिपाई व पहारेकरी यांची प्रत्येकी दोन पदे आहेत. याशिवाय मुख्य लिपिक (ग्रामीण), कनिष्ठ लेखापरीक्षक, लेखापाल (ग्रामीण), मुख्य रोखपाल, लिपिक टंकलेखक, वाहन तपासणीस, नाईक आणि स्वच्छक या संवर्गातील प्रत्येकी एका पदाचा समावेश आहे.

कंत्राटी पदांनादेखील मुदतवाढ

राज्यातील सर्व प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील पदांचा आढावा घेताना कायमस्वरुपी व कंत्राटी तत्वावर भरावयाच्या पदांचा देखील यात समावेश करण्यात आला. त्यामध्ये पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील आणि पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन तपासणीस या प्रत्येकी दोन अशा एकूण चार पदांचा समावेश केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.