भाजपने साध्वींची उमेदवारी रद्द करावी

पिंपरी – मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये हेमंत करकरे, विजय साळसकर व अशोक कामठे हे तीन वरिष्ठ पोलीस अधिकारी शहीद झाले. देशासाठी व देशाच्या सुरक्षेसाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या शहिदांविषयी प्रज्ञासिंग साध्वी यांनी अपमान करणारे वक्‍तव्य केले. त्यामुळे देशातील जनता त्यांना कधीच माफ करणीा नाही. या साध्वीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची उमेदवारी भाजपाने रद्द करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.

हेमंत करकरे यांना मारल्यामुळे माझ सुतक संपले असे साध्वींच वक्‍तव्य देशातील जनतेचा अपमान करणारे आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी प्रज्ञासिंग साध्वी आहे. अन्य ठिकाणच्या बॉम्बस्फोटाचे व दहशतवादी हल्ल्याच्या गटांमध्ये सुद्धा साध्वीचा हात आहे. ही देशद्रोही व्यक्‍ती भाजपकडून भोपाळमध्ये उमेदवारी घेऊन लढत आहे. त्यामुळे साध्वी यांची उमेदवारी रद्द करावी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.