Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीत सांगलीतील राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी कडून शिवसेना उद्धव ठाकरे गटातील चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली मात्र त्यांच्या उमेदवारीला सांगलीतील स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध केला आहे. सांगली हा सुरुवाती पासून काँग्रेसचा गड आहे त्यामुळे इथून काँग्रेसच्या नेत्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी स्थानिक काँग्रेस नेते यांनी केली होती. तसेच काँग्रेसला तिकट मिळाले तर सांगलीत नक्कीच विजय मिळेल असा दावा देखील विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांनी केला होता.
अशात आता आपल्याला डावललं गेलं, अन्याय झाल्याची भावना विशाल पाटलांनी बोलून दाखवली. आता या सगळ्या प्रकरणात आता जयंत पाटलांचं नाव समोर आलं आहे. जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांचा जयंत पाटलांवर केला आहे. ते म्हणाले,’सांगलीचे काँग्रेसची जागा जाण्याच्या खेळीतील खलनायक जयंत पाटील आहे. सांगलीच्या काँग्रेस आणि विशाल पाटलांच्या बाबतीत केलेली सगळी खेळी जयंत पाटलांची आहे. सगळ्या खेळी जयंत पाटलांनी संजय राऊतांच्या माध्यमातून केल्या, असा गंभीर आरोप जगताप यांनी केला आहे.
तत्पूर्वी, सांगली लोकसभेत तिरंगी लढत निश्िचत झाली आहे. काँग्रेस बंडखोर विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. विशाल पाटील यांनी उमेदवारी कायम ठेवत अपक्ष लढण्याची भूमिका कायम ठेवली आहे. त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आला आहे.
हे वाचले का ? खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग लोकसभा निवडणूक लढवणार; खडूर साहिब मतदारसंघातून उमेदवारी ‘जाहीर’