शिरुर तालुक्‍यातील 39 गावांतून वळसे पाटलांना मताधिक्‍य

28 हजार 624 मतांची आघाडी : एकजुटीने काम केल्याचा फायदा

मंचर – आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि विजयी उमेदवार आमदार दिलीप वळसे पाटील यांना आंबेगाव विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या 39 गावांमधून 28 हजार 624 मतांचे मताधिक्‍य देत या गावांनी वळसे पाटील यांना भक्कम साथ दिली आहे.

आंबेगाव-शिरुर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष असलेल्या मानसिंग पाचुंदकर व जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर यांच्या रांजणगाव गणपती, कारेगाव जिल्हा परिषद गटाने 11 हजार 215 मतांची वळसे पाटील यांना सर्वाधिक आघाडी दिली. या गावातून 1 हजार 76 मते, तर शिरुर तालुका पंचायत समितीचे सभापती विश्‍वास कोहकडे यांच्या कारेगाव येथून 271 मतांची आघाडी मिळाली आहे. माजी आमदार पोपटराव गावडे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या टाकळी हाजी, कवठे येमाई जिल्हा परिषद गटातून वळसे पाटील यांना 8 हजार 324 मतांची आघाडी मिळाली.

वळसे पाटील यांना गावडे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे व पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे यांच्या टाकळी हाजी गावांतून 2 हजार 6 मतांची आघाडी मिळाली, तर केंदूर-पाबळ जिल्हा परिषद गटातून 9 हजार 85 मतांची आघाडी मिळाली.

जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे व माजी सदस्य नंदकुमार पिंगळे यांच्या पाबळमधून 2 हजार 188 मते, माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांच्या मुखईमधून 400 मते, तर बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, उद्योजक सदाशिव पवार, जिल्हा दूध संघाच्या संचालिका केशरताई पवार आणि पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष उमाप यांच्या जातेगावमधून 962 आणि पंचायत समिती सदस्या सविता पऱ्हाड यांच्या केंदूरमधून 3 हजार 356 मताधिक्‍य वळसे पाटील यांना मिळाले. बाजार समितीचे संचालक शंकर जांभळकर यांच्या करंदी गावाने झालेल्या मतदानापैकी 81 टक्‍के मतदान वळसे पाटील यांना दिल्याचे दिसून येते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.