पेठ (प्रतिनिधी) : करोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून सार्वजनिक ठिकाणी रात्रंदिवस कार्यरत असलेल्या मंचर व घोडेगाव येथील पोलीस, आरोग्य कर्मचारी, महसूल व पंचायत समिती कर्मचारी यांना बायर क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांनी सातगाव पठार हुंडेकरी असोसिएशन यांच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी जपत पी. पी.ई किट चे वाटप करण्यात आले, अशी माहिती वेताळ बुवा हुंडेकरी मालक राम तोडकर यांनी दिली.
या किटमध्ये दोन इ. एन. 149 मास्क दोन सेट, हॅन्डग्लोज, एक गॉगल आशा महत्वाच्या बाबी त्यात आहेत. अशा एकूण 300 किटचे वाटप करण्यात आले. या आरोग्य किट्स वितरण प्रसंगी शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, पंचायत समिती सदस्य शितलताई तोडकर, उद्योजक भाऊसाहेब सावंत पाटील, आशोक बाजारे, उपसरपंच अनिल सनस, आंबेगाव तालुका शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन तोडकर, अंकुश बुट्टे आदी मान्यवर उपस्थित होते.
यासाठी वेताळ बुवा कृषी सेवा केंद्राचे मालक राम तोडकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत बायर कंपनीचे फूड चेन व्यवस्थापक गणेश साळुंके यांच्याकडे यासाठी मागणी केली होती. ती कंपनीने मान्य करून सातगाव पठार व आंबेगाव तालुक्यासाठी तीनशे किट ऊपलब्ध करून दिले आहेत. त्यासाठी कंपनी च्या सर्व अधिकारी यांचे यांचे कौतुक सर्व कर्मचारी यांनी केले.