एलियनशी संबंधित अनेक कथा आहेत. काहींचा विश्वास आहे की तो खरा आहे, तर काहींचा विश्वास आहे की ही केवळ अफवा आहे. सध्या पेरूमधील एका गावातील लोकांनी एक धक्कादायक दावा केला आहे. सात फूट उंच एलियन्सने त्यांच्यावर हल्ला केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिवाय, येथील नेत्यांचे म्हणणे आहे की त्यांच्यावर बंदूकीतील गोळ्यांचाही काही परिणाम होत नव्हता.
अवैध खाणकामाचे माफिया असू शकतात –
एलियन्सबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. लोकांनी त्यांची तुलना स्थानिक अंधश्रद्धेशीही केली. तथापि, पोलिस अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार ते एलियन्स नसून सोन्याच्या खाणीचे अवैध उत्खनन करणारे माफिया आहेत. ब्राझीलच्या ‘ओ प्राइमरो कोमांडो द कॅपिटल’, कोलंबियाच्या ‘क्लॅन डेल गॉल्फो’, FARC सारख्या ड्रग कार्टेलशी संबंधित ते माफिया असावेत, असा दावा पोलिसांनी केला आहे. तपास करत असलेल्या पेरूच्या राष्ट्रीय अभियोक्ता कार्यालयाने सांगितले की, सोन्याशी संबंधित “माफिया” या हल्ल्यांसाठी जबाबदार आहेत.
घाबरवण्याचा प्रयत्न करताहेत –
सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोने माफिया दहशत पसरवून पेरूमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक लोकांना त्यांच्या घरात कोंडून ठेवणे हा यामागचा उद्देश आहे. बेकायदेशीर खाण माफियांनी पेरूमधील नानय नदीच्या आसपासच्या जंगलात सोने शोधण्यासाठी जेटपॅकचा वापर केला आहे. त्यामुळे ते एलियन्स नसून अवैध सोन्याच्या खाणीचे माफिया आहेत.
माफिया सोने शोधत आहेत –
सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की या बेकायदेशीर खाण कार्टेलद्वारे जेटपॅकचा वापर पेरूमधील नानाय नदीच्या आसपासच्या जंगलात खोलवर सोने शोधण्यासाठी केला गेला आहे.
जुलैपासून एलियन्स आले –
अल्टो नानेचे इकिटू सदस्य सांगतात की गावात एलियन्सचे आगमन 11 जुलैपासून सुरू झाले. त्याच वेळी, आता गडद हिरव्या रंगात दिसलेल्या 7 फूट उंचीच्या रहस्यमय प्राण्याने हल्ला केल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. अॅमेझॉनमध्ये वाहणाऱ्या ननया नदीच्या उपनद्यांच्या तळाशी या भागात सोने जमा झाल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.
इकिटूचे नेते जैरो रेतेगुई अविला यांनी सांगितले की, हल्लेखोर मानव नसून एलियन आहेत. त्यांच्यावर दोनदा गोळी झाडली, पण तो खाली पडला नाही तर गायब झाला. गावात काय चालले आहे, याची सर्वांनाच भीती वाटते. त्याच वेळी, आणखी एका साक्षीदाराने सांगितले की शाळेतील एका शिक्षकाने जमिनीवरून विचित्र प्राणी उडताना पाहिले. या प्रकरणाचा तपास करणारे सरकारी वकील कार्लोस कॅस्ट्रो क्विंटनिला यांनी सांगितले की, हल्लेखोर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत होते, दुसरे काहीही नाही.
दरम्यान, संबंधित वृत्तांवरून समोर येत आहे की, ते एलियन्स नसून अवैधपणे सोन्याच्या खाणीचे उत्खनन करणारे माफिया आहेत. ते सोने शोधत आहेत. नागरिकांचा, प्रशासनाचा त्यांना त्रास होऊ नये म्हणून ते अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून एलियन्स असल्याचे भासवत आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पेरू प्रशासनाकडून करण्यात आले आहे.